title-unknown-5
title
तुझ्यातला सूर्य जराही ढळू देऊ नकोस रे ..
मनातल्या मळभा चा ढीग साठू देऊ नकोस रे ...
वेदनांच्या गर्तेत फसून जाऊ नकोस रे...
विचारांच्या आवर्तनात हरवून जाऊ नकोस रे...
अंधार जरी चोहीकडे तरी हिम्मत हरू नकोस रे ...
चंद्र चांदण्यातही सूर्याचाच त्या प्रकाश रे ...
त्यांच्या सोबतीने धर सूर्योदयाची आस रे ...
ढळू दे मळभाचे ढग अन जाऊ दे बरसून त्यांना ...
लक्ख प्रकाशात तुझ्यातल्या इंद्रधनूला आव्हान दे ...
मनातील आशा जराही मिटू देऊ नकोस रे...
तुझ्यातला सूर्य जराही ढळू देऊ नकोस रे ...
तुझ्यातला सूर्य जराही ढळू देऊ नकोस रे ...

