title-unknown-3
title
एक मुग्ध कालिका जागी झाली, तेंव्हा तिला एक गोष्ट उमगली...
ती तर होती एक अबोली, कळल्यावर ती थोडी हिरमुसली...
जरी साऱ्या बागेत फिरली, साऱ्या फुलांत वावरली तरी...
अनेकदा होती ती बावरली, कित्येकदा अंधारात मुसमुसली...
मनात थोडी खंतावाली, तरी देखील नाही मागे हटली ...
जीवन स्वीकारून जगू लागली, विविध वाटा आक्रमू लागली...
नवी क्षितिजे खुणावू लागली, स्वतःची नव्याने ओळख पटली...
नव्या स्वप्नांत नव्या गप्पात रमू लागली, स्वतःच्या भावना लिहू लागली ...
आनंदाने झुलू लागली, नव्या रंगाने खुलू लागली...
अनेकांची प्रेरणा बनू लागली, अनेकांत आशा जगवू लागली...
बघता बघता त्या अबोलीची बनली, एक सुंदर गुलबकावली!

