title-unknown-21
title
वैधानिक ईशारा: सदर कविता केवळ मनोरंजनासाठी आहे; कृपया कोणी राग मानू नये!
तशी मी सोशल आहे, माझा मित्र मैत्रिणींचा choice अगदी स्पेशल आहे,
माझ्या भोवती विविध celebritiesचे सर्कल आहे!
माझा सगळ्यात खास दोस्त मिनिस्टर चा साला आहे
आणि अगदी जीव भावाची मैत्रिण शाहरुख खानची बहीण आहे
माझ्या आणि सचिन तेंडूलकरच्या घरात एकच पेपरवाला येतो
त्यामुळे आमचे अगदी घरोब्याचे संबंध आहेत
विश्वनाथन आनंद माझ्या शेजारणीकडे आला होता
पण खरे सांगू तो तिच्यापेक्षा माझ्याशीच जास्त बोलला होता
आजची नामवंत डॉक्टर आरती शाळेत माझ्या शेजारीच बसायची
मी काठावर उभी राहून तिला स्वीम्मिंग करायला शिकवायची
Physics स्पेशालीस्ट जयश्री, माझ्या शेजारीच रहायची
सारख्या शंका विचारून माझे डोके खायची
मोठ्या Multinational कंपनीचा director नितीन
अहो जायचो आम्ही एकाच tuition ला,
तरीसुद्धा समजले नाही गणित तर मलाच यायचा तो विचारयला
प्रमोद मिलिंद रवी वसंत शैलेश आजचे entrepreneur आघाडीचे
कित्तीतरी वेळा मलाच सल्ला मागायला यायचे
साधना धनु रागीणीचे गुपित तुम्हाला म्हणून सांगते
शाळेत तिघी सारख्या भांडायच्या आणि
मलाच ते सोडवायला सांगायच्या...
गझलांचा बादशहा भूषण माझ्याकडे आला होता
अहो शाळेत असतांना कित्ती वेळा माझा डब्बा त्याने खाल्ला होता
तशी मी सोशल आहे, माझा मित्र मैत्रिणींचा choice अगदी स्पेशल आहे. माझ्या भोवती विविध celebritiesचे सर्कल आहे!
प्रत्येक पार्टीला मी जराशी उशिरानेच जाते, माझ्या चाहत्यांना थोडी वाट पाहायला लावते
घरातून बाहेर पडले की watchman लगेच सलाम करतो
रिक्षेवाला madam madam करून बोलवतो
मी थोडीच कुणा एय्र्यागैईऱ्यानकडे बघते
सरळ लक्ष नाही दाखवून कॅब मधून निघून जाते
अहो celebrities ना जसे चहात्त्यांना चुकवावे लागते
तसेच मला देखील आत्ता पासून practice करायला लागते!!

