title-unknown-20
title
खटपट लटपट, लटपट खटपट
धडपड गडबड, गडबड धडपड
कशासाठी कुणासाठी? कुणासाठी कशासाठी?
खुडबुड लुडबुड, लुडबुड खुडबुड
धांदल धावपळ, धावपळ धांदल
अशासाठी तशासाठी, तशासाठी अशासाठी...
शीरावर उरावर, उरावर शीरावर
वणवण भणभण, भणभण वणवण
याच्यासाठी त्याच्यासाठी, त्याच्यासाठी याच्यासाठी...
खरतर साऱ्याचे उत्तर साऱ्याचे उत्तर खरतर
एकच आहे साऱ्यांसाठी, एकच आहे साऱ्यांसाठी
केवळ माझ्यातल्या मला सुखावण्यासाठी, ‘मी’ पण संभाळण्यासाठी!

