title-unknown-19
title
प्रकाशवाटेच्या प्रवासाची इच्छा बाळगणारा मी एक धुळीचा कण
स्वप्न बाळगून उराशी, फ़िरतोय जागोजागी वणवण
स्वार व्हायचंय सूर्यकिरणावर, अनोखे शिखर सर करायचंय
सप्तरंगी इंद्रधनूच्या पल्याड अगदी क्षणार्धात पोहोचायचंय
बनायचंय जादूमय अदभूत प्रकाशकण (Photons)
अंधाराला आशेचे स्वप्न दाखवणरे
जीवनाला स्पंदनांनी नव्यानें अर्थ देणारे, हरक्षण
पण थोडे उडायला लागले की उठतय वावटळ क्षणार्धात
जसे काही पायात बेड्या ज्यांचे वजन मण मण
काय करावे कसे उडावे कसे स्वप्न साकारावे
सारे काही जखडलेले, आक्रन्दून उठे तन मन
गोठलेल्या वेदनांचे साक्षी एकांतातील हळवे क्षण
अशाच एका नाजूक क्षणी हातामध्ये आरसा आला
स्वतःच्याच रुक्ष प्रतिबिंबाकडे बघून मनोमन हादरून गेला
मग त्याच्यासमोर मी आजवर धारण केलेला एकेक मुखवटा निखळून पडला
कॅलिडोस्कोप बनून माझ्याभोवती फिरू लागला
दाखवू लागला माझीच रूपे मीच धारण केलेली
कधी कुणावरचा अनावर राग संताप
तर कधी मनःपूर्वक झालेला पश्चाताप
कळत नकळत झालेले गुन्हे अपराध
तर कधी मनात दडलेले भीतीचे बागुलबुवे
स्वतःला घातलेली नवविविध वेष्टणे
तर कधी स्वतःवर बांधून घेतलेली बंधने
कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा लपवण्यासाठी
तर कधी स्वतःला चांगुलपण्याच्या मखमलीआड सजवण्यासाठी
माझीच बंधने झाली होती माझ्याचसाठी टोकदार तारेची कुंपणे
जाणवू लागले त्यांचे जाचक कुरतडणे आणि मलाच खाणे
मग मात्र माझ्यातल्या मला कळले
जर स्वप्न साकारायची असतील, तर कुंपणे तोडलीच पाहिजेत
भूत भविष्याच्या साखळ्या वर्तमानात विरघळवून टाकल्याच पाहिजेत
मोकळा श्वास स्वप्नांचा ध्यास नवी उमेद नवचैत्यन्य शिदोरीला घेऊन
हसत हसत पुढे पावलं टाकत मार्गस्थ व्हायलाच पाहिजे
मग धुळीच्या कणाला सप्तरंगी इंद्रधनूच्या पल्याड पोहोचायला
जादूमय अदभूत प्रकाशकण बनायला एकच क्षण पुरेसा आहे
कॅलिडोस्कोपमध्ये स्वतःला जोखायला एकच क्षण पुरेसा आहे
सुरेखा
, क्षणभर सत्यात आणतात अभासांना!
थंड वाटते डोळ्यांना, स्वप्नांचे रंगलेले इमले अनुभवतांना!
अन मग, मन आपसुकच विसावते त्यांच्या निवऱ्याला,
तेवढा आराम पुरतो पुन्हा नव्याने जगण्याच्या प्रेरणेला!
मग स्वप्नं अलगद सत्यात उतरतात आणि
जीवनात नव्याने रंग भारतात!
परत नवे इमले बांधायची स्फूर्ती देतात...

