title-unknown-18
title
तुपाचे निरांजन, टाळ्यांचा गजर
गडगड ढगांनी वाद्यांनी दिली सलामी जोरदार
लखलख बिजलीने केली रोषणाई चमकदार
सूं सूं वाऱ्याने दूरदूरवार्ता पसरवली घोंगावत
नभातून आले वरुणराजे धरतीवर बरसत हसत
जीवनाचा स्त्रोत नव्याने पुन्हा एकदा जागवायला
खळखळाटातून दऱ्याकपारींतून जीवनलेणे साकारायला
उद्याच्या शाश्वतीचे सप्तरंगी स्वप्न रंगवायला
तृषार्थांच्या तृषेला ओतप्रोत तृप्तीने शमवायला
हिरवाईतून फुलाफळांतून संप्प्नेतेने बहरायला
रानावनात, मनामनात ‘सुजलाम सुफलाम’ चा जल्लोष घुमवायला !

