title-unknown-13
title
वृध्दाश्रमाच्या कथा आणि व्यथा
पापण्या ओलावणाऱ्या, खंत दटावणाऱ्या
वृद्धाश्रमांचा बागुलबुवा
दाखल करणाऱ्यांना मनाला कुर्तडणारा
आणि दाखल होणाऱ्यांना मनाला ओरबाडणारा
क्लेशकारक नकोनकोसा वाटणारा
तारुण्यात तर, म्हातारपणं नको रे बाबा म्हणून भिववणारा
खरे तर आयुष्याची वयाने देखील उंची गाठणे म्हणजे
त्या परमात्म्याने दिलेल्या जीवनाचे शिखर सर करणे
जेष्ठ बनणे म्हणजे परिपक्व्तेचा आनंद घेणे
अंतर्मुख होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करणे
वृध्दाश्रमाकडे नव्या दृष्टीने बघितले तर्
काळाची गरज म्हणून वेगळ्या वळणावर विसावले तर
वृध्दाश्रमाला जर वानप्रस्थाश्रम मानले तर्
सकारात्मकतेने स्वीकारले तर
बघता बघता कायापालट होईल
मनांचा आणि नात्यांचा
सांजवतेला आनंद मिळेल अंधारातही तेवण्याचा
एक नवे शुभंकरोती साकारेल
स्नेहाचे तेल आणि समाधानाची साथ,
दिवा जळो सारी रात
मनातील पीडा बाहेर जाऊ दे,
शुभ्र चांदणे मनांत जागू दे!
घरच्या जेष्ठांना आणि त्याच्या आप्तेष्ठांना
उदंड अलौकिक प्रेमाचा लाभ होऊ दे !

