वारकरी
वारकरी
झाल्या साऱ्या वाटा आता मोकळ्या...
तुझ्या प्रेमाचा आनंद सोहळा,
त्याला साक्षी भक्त जनांचा मेळा,
विठ्ठला तुझ्या नामातच रंगला!
तुझे नाम मनी ध्यानी,
तुझे कीर्तन कौतूक साऱ्या जनी,
तुला भेटायाची ओढ...
पुन्हां भक्तांत जागली!
धन्य धन्य तो वारकरी,
धन्य धन्य तो अभंग,
धन्य धन्य तो सावळा हरी,
हरेक मनी तो जगला!
माझ्या मनीचा भाव,
मी जेंव्हा तुझ्या सेवेत अर्पिला,
अद्भुत आनंद झरपला...
वाटे हृदयीं विठ्ठल प्रकटला !

