आता बास
आता बास
पुन्हा पुन्हा तेच रडगाणे,
नको पुन्हा ते बहाणे,
तेच घीसे पिठे बँड बजावणे,
नित्य नवी गाऱ्हाणी गाणे,
आता बास
त्या खोल गर्तेत ओढले जाणे
त्या वेदनांशी झुंजत जखमी होणे
छळणाऱ्या यातनांशी समझोता करणे
त्या वीषचक्रात हरवून जाणे
आता बास
स्वतःला थांबवणे
अंतरंगातील ऊर्मीला दाबून जगणे
स्वतःतल्या ठिणगीला सतत दुर्लक्षिणे
प्रकाशासाठी दुसऱ्यावर विसंबणे
आता करायची एकच गोष्ट खास
राहील एकच ध्येय एकच ध्यास,
हरेक श्वास आनंदमय उत्साहवर्धक,
आणि उश्वास प्रेममय आरामदायक,
जागेल मग अंतरंगातील स्वयंप्रकाश!
जो दाखवेल स्वप्नीच्या जीवनवाटा,
त्यांच्यावर चौफेर दौडायचे,
सारे छंद जोपासायचे,
धूंद मस्त जगायचे,
विसरून सारे व्रण आणि ताण!
स्वानंदात चिंब भिजायचे,
गर्क होऊनी स्वतःमध्ये,
गिरक्या घ्यायचात झोकामध्ये,
फुलून यावयाचे, खुलून जायचे...
खळखळून हसायचे, मनसोक्त बगाडायचे...
प्रेमच जगावयाचे मनामनांत...
त्या उत्कट स्पंदनात , त्या तृप्त श्वासात,
जगून घ्यायचे हर क्षणात...
जगून घ्यायचे हर क्षणात ...

