ळ्यात मळ्यात
ळ्यात मळ्यात
चेहऱ्यावर हसू अन आवंढा गळ्यात चालणार नाही ...
अहो सुख पण भरभरून घेता यायला पाहिजे...
अन दाद पण समरसून देता यायला पाहिजे ...
तालावर मनमुराद नाचत यायला पाहिजे ...
स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता यायला पाहिजे...
एखाद्या विनोदावर खळखळून हसता यायला पाहिजे...
शोकाकुल झाल्यास ढसाढसा रडता यायला पाहिजे ...
नरो वा कुंजरवा हरघडी करत, कुढत बसले तर चालणार नाही चालणार नाही !

