राज्य
राज्य
सत्ताधीश या जगाचा , सत्तेवर असून देखील भासवत नाही,
आपल्याला राज्य देऊन टाकतो , स्वतः अदृश्य राहून आशीर्वाद देत रहातो.
दुखलं खुपलं तर सांभाळत राहतो, नवसाला पावत रहातो.
त्याच्या केलेल्या पूजेला स्वीकारत राहतो, नैवेद्याला चाखत रहातो.
भक्तीला मार्ग दाखवत राहतो, भावाला जोखत रहातो.
लपाछपीचा डाव मस्तपैकी खेळात रहातो.
“राज्य” आपल्याला देऊन एकवार एक धप्पे घालत रहातो.
कधीपर्यंत चालणार रे असा खेळ ? किती वेळा राज्य घेऊ लागत नाही काही मेळ!
आता तुझे राज्य तुलाच देणार, मी जीवन जगणार आनंदाने निर्भेळ...
हाती आलेला क्षण तुझा प्रसाद मानणार,
या जीवनाचे चोख सार्थक करणार,
माझ्या वाटेला आलेले जीवनदान सार्थकी लावणार !

