वीण
वीण
पाखरांनी झेप घ्यायलाच हवी , नवी क्षितिजे शोधायलाच हवी.
नव्या वाटांवर संचारताना, घरट्यातली ऊब मनात जपायलाच हवी.
ज्या घरट्याने उडायची उर्मी दिली, ज्या पंखानी उडायचे धडे दिले,
ज्या चोचींनी भुकेला घास दिला, त्यांच्या प्रेमाची ठेव मनात जपायलाच हवी,
नव्या दिशा नव्या वाटा, नवी नाती, नव्या व्यथा, नव्या कथा.
या साऱ्यांतून मार्गक्रमण करून, हिमतीने स्वतःची वाट शोधायलाच हवी.
स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी पंख पसरून उडण्याचे वरदान त्यांना लाभले आहे,
या वरदानाच्या विश्वासाच्या बळावर,थक्क करणारी नवी उंची गाठायलाच हवी,
एवढेच नव्हे तर उंची गाठण्याची ही शृंखला पुनः पुन्हां पुढे न्यायलाच हवी.
जुन्या नव्या नात्यांना घट्ट धरणारी ‘वीण’ परत एकदा बांधायलाच हवी, परत एकदा बांधायलाच हवी!

