Katha
कथा
अस्स ही चालतं नाही आणि तस्स ही जमत नाही
नक्की पाहिजे काय काही कळत नाही
असे केले तर तस्से होईल
पण तस्से झाले तर मग कस्से होईल
कस्से झालेले चालणार नाही
तस्से केलेले जमणार नाही
ही नाही हो माझ्या एकटीची व्यथा
आहे ही प्रत्येक वाचणाऱ्याची कथा
अहो मी काही कोणाला तस्से सांगणार नाही
पण माझ्या तुमच्या व्यथेला दुर्लक्षिणारं नाही
अस्सा तरी उपाय शोधेल की सारे नक्की कळेल
किंवा तस्सा तरी मार्ग शोधेल
की कोणाला काही कळणार नाही

