जाग
जाग
देव ज्याला चोच देतो त्याला नक्कीच चारा देतो
हवेला वारा देतो, सागराला किनारा देतो
नदीला तो वाट देतो, नात्यांना खूणगाठ देतो
फुलांना सुवास देतो, मनांना तो ध्यास देतो
पाण्याला ओलावा देतो, कंठांना सांगावा देतो
रात्रीला तो जाग देतो, अग्नीला तो आग देतो
पंखाना झेप देतो, वाऱ्याला तो वेग देतो
विविध भावनांना भाव देतो, चवींना चव देतो
अस्तित्वाला उद्देश देतो, जीवाला नवा वेष देतो
उत्पत्तीला प्रेरणा देतो, स्थितीला वरदान देतो
लयीला विलीन करतो, अभिशापातून उगम पावतो
उत्पत्ती,स्थिती,लयीच्या जाणिवेतून नव्या संवेदनेला जाग देतो

